आर्य चाणक्यमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

Foto
पैठण, (प्रतिनिधी): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य विद्या मंदिर पैठण येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात झाला.

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आर्य चाणक्य विद्या मंदिर येथील नविन इमारतीत कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत माता व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. जयंत जोशी (विद्यासभा अध्यक्ष) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संविधान व तंबाखू मुक्त अभियानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. पद्य गायन शिवराज धनसुरे यांनी केले. जिल्हास्तरावर यश प्राप्त केल्यानंतर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनास सहभागी होणाऱ्या शिवेंद्र प्रमोद काकडे व मार्गदर्शक शिक्षक सर्फराज अंबेकर, मनोज शिंगारे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या.

सोबतच समर्थ मिसाळ यांची इस्रो परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. या वेळी अध्यक्ष डॉ. राम लोंढे आणि विद्यासभेचे अध्यक्ष डॉ. जयंत जोशी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी संचालक डॉ. पद्मकुमार कासलीवाल, जुगलकिशोर लोहिया, शिवाजी मारवाडी, विजय चाटुपळे, नंदकिशोर मालाणी, किशोर भाकरे, अनिल कावसानकर, रेणुकादास गर्गे, रविंद्र साळजोशी, डॉ. सुनिल गायकवाड, भा. शि. प्र. केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती जोशी, पांडुरंग थोटे, प्रमोद रासने आदीसह पालक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विलास खर्डेकर यांनी तर सतिश आहेर यांनी ध्वज संचालन केले. वर्षा पाडळकर यांनी आभार मानले.